शिक्षण की प्रक्रिया
शिक्षण की प्रक्रिया
हल्ली म्हणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना
मित्र-मैत्रीण म्हणून वागवायचे असते...
देवतांच्या गाभाऱ्यात पुजायचे असते,
पाळण्यातल्या बाळागत जपायचे असते,
वेळकाळाच्या बंधनात अडकवायचे नसते,
त्यांच्या सोयीनुसार त्यांना स्वीकारायचे असते,
अपुर्णच्या शेऱ्यात गुंतवायचे नसते,
चुका तर कधी दाखवायच्या नसतात,
स्थितप्रज्ञ राहून कामकाज चालू ठेवायचं असतं...
त्यांची फी आणि आपले दोन हात यांचे समीकरण जुळवायचे असते,
त्यांच्या अटी, शर्थींसह मान्य करायच्या असतात,
आपलं घरदार अन् सोशल लाइफ सांभाळत ते तुमच्यापर्यंत पोहचतात यातच धन्यता मानायची असते,
पुर्ण कराचा नादघोष करत तुम्हीच त्यांच्या मागे फिरायचे असते,
तुमच्या शब्दांना त्यांच्या लेखी काहीच किंमत नसते हे अनुभवानेच जाणवायचे असते...
फक्त सह्याजीराव म्हणूनच रहायचे असते,
त्यांच्या कागदाला कागद जुळवून देण्यापुरतेच आपले अस्तित्व मान्य करायचे असते,
अशावेळी शिक्षक म्हणून काळ काम वेगाच कुठलंही गणित सोडवायचं नसतं,
ज्ञानीजन गुरूजनांची माफी मागत
गांधीजींच्या तीन माकडांच्या भूमिकेत शिकायचं असतं...
फक्त ज्ञानाच्या भुकेल्या विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान करायच असतं
तहान-भूक विसरून कामाला लागायचं असतं
शिक्षण आणि प्रक्रिया यांना एकत्र आणायचं असतं
