शिक्षक
शिक्षक
1 min
143
नखशिखांत अंधार
भरलेल्या चिमुकल्या गोळयातून,
सुर्याचे तेज बाहेर काढणारा,
तोच समाजसुधारक क्रांतिकारकही तोच,
कित्येक चेतनांना पाठबळ असते,
त्याच्या समर्थ तत्वज्ञानाचे,
शिक्षकाला जपावी लागतात,
कुतूहलाच्या झाडाची पाने जीवापाड,
आणि आधार द्यावा लागतो,
एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला
