शिक्षिका
शिक्षिका
1 min
161
गोडी लावी
मज शिक्षणाची।
देई शिदोरी
बांधून ज्ञानाची।
उंच भरारी
घेण्यास शिकवी।
हात धरुनिया माझा
पाटीवर गिरवी।
चिऊ काऊच्या गोष्टी
आम्हा सांगतसे ।
शाळेत येण्याचा
लळा लावीतसे।
नेहमी हसतमुख
प्रसन्न चेहरा।
टापटीप राहणीमान
कामात निटनेटकेपणा।
तुमच्या चरणी बाई
मी नतमस्तक।
नेहमी असुद्या डोक्यावर
माझ्या वरदहस्त।
