Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक श्रावणसरी

शीर्षक श्रावणसरी

1 min
10


झडझड आषाढाची , आता सरली गं सये

रिमझिम सरी आल्या , आला श्रावण गं सये   (1)


घननीळ बरसतो , नद्या , धबधबे वाहती

प्रपातांचे शुभ्र पाणी , तुषार ये अंगावरी    (2)


वसुंधरा सजली गे , हिरवी वस्त्रे लेऊनीया

साज फळांचा फुलांचा , स्वागताला घालूनीया  (3)


मंद वा-याची झुळूक , कुंदवात दरवळे

चैतन्य हे पानोपानी , सख्या झडकरी तू ये   (4)


वरुणाच्या सरी आता , रिमझिम बरसती

वसुंधरेच्या स्वागता , आतुरला गं तो चित्ती   (5)


रश्मी किरणांमधूनी , ऊन हळदुले झरे

अंबरात सप्तरंगी , इंद्रधनू गोफ सजे   (6)


रिमझिम सरी येती , क्षणभरे थबकती

अभ्रांतूनी रविराज , हळूहळू डोकावती   (7)


रिमझिम सरींसवे , आला आला गं साजण

भेट एकांती फुलेल , आता आतुर मन्मन    (8)


रिमझिम धारांमधे , तन मन सुखावेल

ऊन पावसाचा खेळ , मधुमीलन उमलेल     (9)


Rate this content
Log in