शीर्षक प्रेमळ बाप
शीर्षक प्रेमळ बाप
मातेची महती / त्रैलोक्यात ख्याती
बापाची महती / अज्ञातचि (1)
नाही गाजावाजा / अंतरीची माया
कौतुकाची छाया / अखंडित (2)
ध्यास मुलांसाठी / अर्थाजनासाठी
गुंतवणूकीसाठी / सदा दक्ष (3)
मुलांत अपूर्ण / स्वप्ने साकारतो
सदाचि झटतो / निरपेक्ष (4)
मुलगा-मुलगी / समानचि मानी
दोघांनाही ज्ञानी / करीतसे (5)
चैन , मौज , मजा / देतसे सोडून
मुले घडवून / सार्थकता (6 )
लेकीच्या लग्नात / होतो नारायण
काढतसे ऋण / हौसेपायी (7)
मुलाच्या संसारी / इदं न ममचि
आहे ते सर्वचि / अर्पितसे (8)
कृतकृत्य होई / समाधानी राही
संध्याछाया पाही / आनंदाने (9)