STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

शीर्षक माझी मातृभूमी

शीर्षक माझी मातृभूमी

1 min
498

महाराष्ट्र मातृभूमी

भूमी ही छत्रपतींची

ख्यातनाम पुण्यभूमी

खाण असे संस्कृतीची   (1)


ज्ञानेश्वर तुकाराम

संत पावन भूमीचे

ज्ञानेश्वरी गाथा ग्रंथ

जगतात ख्यात साचे    (2)


नाट्य , संगीत कलांचे

कलावंत गुणवंत

अभिनेते अभिनेत्री

कीर्ती जगदविख्यात     (3)


वारी भक्तीपरंपरा

मनी भोळा भक्तीभाव

विठुरायासाठी भक्त

प्रतिवर्षी घेती धाव     (4)


साहित्याची थोर परंपरा

पुल, अत्रे, वपु काळे

ढंग विनोदाचा न्यारा

श्रोता मनोमन डुले     (5)


जन्म लाभे पुनीतशा

महाराष्ट्र भूमीमधे

पुर्नजन्म लाभो इथे

आस ही अंतरामधे     (6)


साहित्याला गुण द्या
लॉग इन