शीर्षक जय गजानना
शीर्षक जय गजानना
1 min
29
जयदेवा जयदेवा , जय गजानना
आरती ओवाळू , प्रसन्न वदना
मुख मनोहर , तेज झळाळते
मुकुटामधूनी , रत्न प्रभा झळकते
मूषक वाहन , प्रिय गजानना (1)
विद्या नि कलांचा , अधिपती राज
भक्त अंगावरी , घालिती रे साज
मोदक चवीचे , द्या विनायकांना (2)
विघ्नहर्ता करी , रक्षण भक्तांचे
आले संकटचि , दुर्घर रोगाचे
तारिसी आम्हांला , रक्षावे भक्तांना (3)