Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक जीवनाचे पुस्तक

शीर्षक जीवनाचे पुस्तक

1 min
41


जीवनाचे पुस्तक कोरे , जन्मतःच हाती येतसे , 

रेखितो त्यावरी अक्षरे , मानव यत्न प्रयत्ने   (1)


बालपणीचा काळ सुखाचा , धमाल मैत्रिणींसवे

पेरु आवळे बोरे चिंचा , पुस्तकी हसरी चित्रे (2)


यौवनातले बहर हिरवे , मोरपिशी जीवनी

प्रेमाचे कवाड खुलले , इंद्रधनू रेखूनी    (3)


आयुष्यातील सुखदुःखांची , नोंद असे पुस्तकी 

कठीण प्रसंगी हात देऊनी , सावरणा-यांची   (4)


संध्याछाया खुणाविती, ईश्वर चिंतन मनी

पैलतीर दिसे नयनी, सार्थकता जीवनी   (5)


कुणा न माहित कधी , पान शेवटले येतसे

जगन्नियंत्या हाती दोरी , विधाताच जाणतसे   (6)


Rate this content
Log in