शीर्षक आले गजानन
शीर्षक आले गजानन
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
34
आले गजानन , रुप मनोहर
येतसे दाटून , भक्तीस बहर //धृ//
विघ्नहर्ता तूच , तूच तारणारा
भक्ती पारखूनी , तूच पावणारा
डोळे लावूनीया , वाट पाहणार (1)
आनंदाचा कंद , देवा विनायका
मुखावरी स्मित , झळके तयाच्या
आज जाहलासे , मनी चिंतातुर
(2)
षोडषोपचारे , भक्त पूजा करी
दुर्वा फुले हार , अर्पणही करी
मोदक नैवेद्य , केलासे तयार (3)
थैमान घालते , संकट रोगाचे
जीवही घेतले , किती निष्पापांचे
करुणासागर , कृपा भक्तांवर (4)
भक्तीभावे केले , स्वागत आपुले
देवा गोड सर्व , मानूनीया घ्यावे
कृपावंत व्हावे , भोळ्या भक्तांवर (5)