STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

शेवटचे पान

शेवटचे पान

1 min
170

पुन्हा एकदा उलटून टाकू वर्षाचे शेवटचे पान 

सुख दुःख सारे विसरून

 बाजूला ठेवू

 निसटलेले क्षण पुन्हा नव्याने जगू छान


झरझर जातात सरून वर्षे 

हातात उरतात काही कडू- गोड आठवणी 

निसटून जातात क्षण ही मनात भरपूर साठवूनी 


गेलेल्या दिवसाची भाषा उमजते

उशिरा फार कशास मग त्रागा

मस्त वाहू द्या आनंदाने जीवनधार 


वेळ कधी कोणासाठी 

सारखी न राहली 

कधी पानगळ तर कुठे नवपालवी बघण्यास मिळाली  

 

होते सुरुवात अगदी आनंदाने 

असो सणाची किंवा उत्सवाची

 पण तसाच शेवटी व्हावा गोड 

हीच एक आशा असते आज प्रत्येक मनाची  

जोडून गतवर्षीच्या शेवटच्या पानाला

आयुष्याचे आपल्या आणखी एक नवे पान 

घेऊ संकल्प मनी मिळवून आज 

जगू आयुष्य ठेवुन

 माणुसकीचे भान  


गेलेल्या वाईट क्षणांना विसरून

चांगल्या आठवणींना द्या उजाळा 

आयुष्य जगा आनंदाने

 करा नववर्षाचे स्वागत  

जपुनी एक छंद निराळा प्रत्येकाने

 शब्द सोबती व्हावे ओंजळीत वहावे लेखणीने 

 कल्पनेला वाव देऊन भाव उमटावे

 कल्पक वास्तव अलंकारिक रचनेने...


Rate this content
Log in