शेवटचा प्रवास
शेवटचा प्रवास
1 min
12.3K
गेले लोक परत, सोडुनी
मला एकटेच पेटत सरणावरती
नाही, नाही म्हणत रडले
असावे कुणी जरी माझ्या मरणावरती
येताच वैकुंठ जवळ
तुटली मग सारी नाती
त्या शेवटच्या प्रवासात
सोबतीला नाहि कुणी साथी
जीवन - मृत्युच्या चक्राने आजगत
जगती या सोडले तरी कुणाला
मग मृत्यू नाव घेताच का
उगाचच दु:ख होते मनाला
आपण चार दिवसांचे वाटेसरु
कस जगायचं तुझं तूच बघुन घे
म्हणुन म्हणतो मित्रा, उद्याचं उद्या
पाहू आज तरी जगुन घे
