शेवट
शेवट
खूप चाललोय सोबत, आता मार्ग वेगळा झाला.
ज्या झाडाच्या सावलीत बसलो, त्याचा उडून गेला पाला.
अनोळखी सुरवात शांत, जवळीक झाली गोडवा.
शब्दांच्या गप्पांनी एकदाचे, आयुष्याला मडवा.
वाटली सुखदुःख, भाकरी सोबत भुकेला.
शेवटच्या घाईत, बरा नव्हे असा अबोला.
साठवलय खूप काही, बोलायला सगळं वेळ मिळेल की नाही.
या एकाच भीतीमुळे, आहे तो ही वेळ जिरेल काही.
नक्कीच आज वेगळे होनार, शेवटाला सुंदर निरोपी सलाम.
अलभ्य साथ तुझी लाभली, आठवणी ठेवल्यात तमाम.
पुन्हा नंतर कधी भेटुच, पण या क्षणावर दुःखाचा सावट.
सुरवातीला ज्याची घाई होती, आता नकोसा झालाय शेवट.
