STORYMIRROR

Arun Gode

Others

3  

Arun Gode

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
245

जमीन कसुन तो सर्वांच्या पोटाची आग बुजवतो,

पण आपल्याच संसाराची वाट स्वतः लावतो.

कधी तरी चांगले दिवस शेत माउली दाखवेल,

आपल्या कुटुंबाचे चांगले दिवस उगवेल.

अहोरात्र कबाड-कष्ट करत दिवस काढतो,

निसर्गाच्या कृपेची वाट बघत बसतो.

तो सर्वानसाठी सारखा शेतात झिझतो,

त्याच्या मदतीसाठी कोनी मागे उभा नसतो.

शेती शिवाय त्याच्या जवळ पर्याय नसतो,

म्हणुन तो नेहमी शेत माउली च्या सेवेत असतो.

शेतक-याचे पहिले शत्रु निसर्ग, भटजी, शेटजी व लाटजी,

आता आले नविन सरकारी कॉरपोरेटरजी.

जेव्हा सरकारच शेतक-याच्या शेतीला डिचवते,

त्याच्या तळ पायतली आग मस्तकात पोहचते.

शेत आहे आन–बान-शान आणि शेत माऊली,

त्याला सहन होनार नाही कॉरपोरेटची सावली.

नवीन कृषि कानुन त्याच्यासाठी गुलामी,

प्रकृतीशी झुंझनारा सहन करनार नाही कोनाची गुलामी.


Rate this content
Log in