STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
372

उभा दिवसभर कष्ट करण्याला

हिरवंगार रान भिजलेला घामान

त्यात मनमानी पावसाची चाले

जगाचा पोशिंदा काम चाले नेमान


काळ्या आईच्या कुशीत

पीक मोत्यासारखे पिकवतो

राब राबतो रात्रंदिन

पोट दुनियेचे भरवतो।


नाही आळस कामाचा

सोबत सर्जा राजा जोडी

मालकाच्या बरोबरीनं काम

सोडवतात सर्व कोडी।


जन्म मातीत घेतला

हात राबतात तिच्यासाठी

होऊन प्रसन्न ती माता

धान्य भर भरून जगासाठी।


कधी अतिवृष्टीन घास 

तोंडापर्यंत आलेला जातो

होते नुकसान पिकाची तरी

नव्या जोमाने उभा राहतो।


नका करू भाव कमी कोणी

त्याच्या घामाच्या कष्टाचा

त्याला नेहमी द्या भरभरून

आहे तो पोशिंदा साऱ्या जगाचा।

आहे तो पोशिंदा साऱ्या जगाचा।


Rate this content
Log in