शेतकरी राजा
शेतकरी राजा
1 min
322
कृषिप्रधान देशाचा
शेतकरी राजा मी
नाही माझ्या दारी
कशाचीच कमी
प्रधान, वजीर सगळेच
माझ्या दारी उभी
फक्त माझ्या दारी
सेवकांची आहे कमी
व्यापारी दलाल येतात
माझ्या नियमित घरी
दरोडा घालून नेहतात की
मालमत्ता माझी सारी
तक्रार कुठे करणार
चोरांची टोळी सारी
कायदे आहेत माझ्यासाठी
कागदावरच भारी भारी
राजाचा मुकुट हाय
कायम माझ्या डोईवरी
नावा पुरता राजा हाय
काम कराव लागतंय सेवकापरी
