शेतकरी राजा
शेतकरी राजा
अधिकारी, व्यवसायिक,
भिकारी साधू संत यांना,
माहित आहे,आपलं
काम आपण केलं तर,
पैसा मिळणार आहे,
मला कोठे माहित आहे,
मी घाम गाळला तरी,
मला काही उरणार आहे,
म्हणुन सारेच मला म्हणतात,
मी शेतकरी राजा आहे.
मला कोठे माहित होते,
लॉकडाउन होणार आहे,
आणि द्रांक्षाच्या वेलावर,
नांगर फिरणार आहे,
माझ्या हाती काहिच
उरणार,नाही.
म्हणुन सारेच मला म्हणतात,
मी शेतकरी राजा आहे.
मला कोठे माहित आहे,
पीक पाणी भरपूर येणार आहे,
अतिवृष्टी कधी दुष्काळाने,
सर्व नष्ट होणार आहे,
हातावरच्या फोडाला,
कष्ट थोडे चुकणार आहे,
आणि दारिद्रयात अजुन,
किती पिढ्या जाणार आहे,
असा मी शेतकरी राजा आहे,
माझं शेत उद्धवस्त आहे,
आणि हातावर फोड आहेत,
असा मी शेतकरी आहे,
मातीतला राजा आहे,
शेतकरी राजा आहे.
