शेतकरी राजा मी बळीराजा
शेतकरी राजा मी बळीराजा
1 min
320
शेतकरी राजा मी बळीराजा
कर्जाची कशी झाली ही बाधा
आली सुगीच्या दिनांची वारी
पण पैका नसे जवळी
कसं करू रे भगवंता
काय ही फजिती झाली
उजाड झाल्या रानाच्या
डोळ्यात दिसे पाणी
रे डोळ्यात दिसे पाणी
शेतकरी राजा मी बळीराजा
कर्जाची कशी झाली ही बाधा
आहे कर्जाचा डोंगर भारी
याले त्रासली घरवाली
घरी नाही पोटाले दाना
चिल्ल्या-पिल्ल्यांची रडारड दारी
कसं जगावं काय?कराव
प्रश्न पडले कपाळी
शेतकरी राजा मी बळीराजा
कर्जाची कशी झाली ही बाधा
