शेतकरी माय
शेतकरी माय
1 min
376
पाहा पाहा ही चालली
मायी शेतकरी माय
फुफाट्यातून वाट काढे
तान्या लेकराची माय।
गाव-रानात माय
अनवानीच चालली
काट्या-कुट्याचीही
तिले आता सुध
ना राहिली।
जीवा-भावाचा गं धनी
शेतामंधी घामेजला
त्याच्या भुकेने व्याकुळ जनू
शिदोरीच झाली।
पोट खपाटीला गेले
पोटामंधी नाचे भूक
तान्या लेकराच्या तोंडी
माय लावी शुष्क स्तन।
हिच्या श्रमानेच होई
शेत-शिवार हिरवे
तळहातावर हिच्या
कृषि संस्कृती गीरवे।
