शेतकरी,कास्तकार
शेतकरी,कास्तकार
1 min
580
जगाचा पोशिंदा
खूपच राबतो
कास्तकार राजा
धान्य पिकवतो....
कष्ट करतोस
गाळतोस घाम
म्हणून मिळतो
तुला बरा दाम...
नांगरतो शेत
बियाणे पेरतो
खत घालतोस
अन्न पिकवतो.....
कृपा कर भूमी
तू धरणीमाई
दे अमाप धान्य
कर भरपाई.....
मुखी सार्यांच्याच
सोन्याचा दे घास
नाहीतर मला
नको बाबा फास...
दिसू दे आता
हरितच रान
पाऊसपाणी दे
नाही येत ताण
