STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

शेतकरी दादा

शेतकरी दादा

1 min
290

रखरखत्या उन्हामंधी

राबतो दादा शेतकरी

अंगाची लाही करून

मिळवी कष्टाची भाकरी ..

दादाना अनेक उपमा

कोणी म्हणे पालनहार

कोणी म्हणे अन्नदाता

जीव जंतूंचे तारणहार ..

अन्न निर्माते जरी असले

यातना,वेदना,दुःख किती?

रात्रंदिवस राबून सुद्धा

वाट्यास धन मिळे किती?..

कांदा भाकरी ठेचा नशिबी

ठिगळलेले वस्त्र नशिबी

नेहमीच ओढाताण पै ची

काटकसर करून कितीबी..

कर्जाचे डोंगर अविरत शिरी

शिक्षण,लग्न,मरण -धोरण

अनेक कार्याची शृंखला

पाडावे पार कशापरी?..

बहू संकटाची खैरात

ओला, सुका दुष्काळ

निसर्गाची अवकृपा

दादा खचून जातो पार..

बलुतेदारांची हीच व्यथा

उन्हातान्हात गाळून घाम

करतो जोमाने नित्य काम

पण उन्हातल्या हातांना

कष्टानुरूप मिळेना दाम..


Rate this content
Log in