शेंगदाणे....!
शेंगदाणे....!
गरम गरम खारे शेंगदाणे
गरम गरम मसालेदार शेंगदाणे
गरम गरम भाजके शेंगदाणे
आरोळी कधी कधी
आडोशाने थंडीच्या दिवसात
हमखास ऐकू यायची
नाहीतर मधूनच
आले ..पाक ,आले... पाक
लांबसडक आरोळी
पकपकायची .....
आता रस्त्यावरचे आवाज
जरा कमी झाले
जस जसे आईस्क्रीम पार्लल
चौका चौकात दिसू लागले
त्यात भरीस भर
मेवाड आईस्क्रीमच्या गाड्या पण
कोपऱ्यात बल्ब लावून थांबू लागल्या
मग त्यातूनच
एखादा कोपरा
मलई कुल्फी वाला पण आडवू लागला
आणि घरात दाणे भाजताना
मला सारा सरंजाम
नजरे समोरून सर्रकन सरकला...
म्हंटले चला एक मस्त पैकी
जेवणा नन्तर फेर फटका मारावा
रस्त्यावरच्या सरंजामाचा आढावा घ्यावा..
नाहीतरी भिजत पडलंय घोंगड
गणित झालय त्रांगड
घरी बसून तरी करायचं काय
आपण आपला दोन घडीचा डाव
गपगुमान बघायचं
नाहीतर मस्तपैकी ताणून द्यायचं
आणि म्हणयाच
ठेविले अनंते तैसेचि रहावे
जे जे होते ते पहात रहावे
स्वप्नांच्या दुनियेत मस्त फिरावे
आंनद जीवनाचा असाही लुटावे....!
