शेकोटीचा सूर्य
शेकोटीचा सूर्य
1 min
458
अंधार पसरत जातो,
आणि शेकोटीचा सूर्य तळपायला लागतो ,
उजळत जातो सभोवतालचा बिनभिंतींचा परिसर ....
उबेची किरणे पसरत जातात ,
कुठल्याही कष्टांची तमा न बाळगता
उद्याच्या आशादायक दिवसाची वाट पहाणार्या चेहेऱ्यावर निरागस हास्य फुलवतात ...
तो चेहरा आश्वस्त करतो
या उबेसाठी धडपडणाऱ्या अन्
धुराच्या निमित्ताने सूर्याकडे पाठ फिरवून
अश्रू पुसणाऱ्या माउलीस ...
