STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

शेकोटी

शेकोटी

1 min
561


थंडीचे दिवस I रात्रीचा गारवा I

कसा तो सोसावा I रस्त्यावर ॥ १ ॥


नसे उबदार | उघडा संसार I

जिणे रस्त्यावर | गरीबीचे ॥ २ ॥


काम दिसभर I क्षणाची विश्रांती |

भाव उजाळती I मुखावरी ॥ ३ ॥


रस्त्याचा कचरा I गोळा केला असा I

आनंदाने बसा | बाजूलाच ॥ ४ ॥


शेकोटी पेटली I गरमी मिळाली I

थंडी ती पळाली I दूरदूर ॥ ५ ॥



Rate this content
Log in