STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

शेकोटी

शेकोटी

1 min
402

थंडीच्या रात्रीत

जमलोत सारी

पेटवली अशी

शेकोटी ही भारी


साऱ्यांनी मिळून

गोळा केल्या काडया

जाळ लावताच

काय उब गडया


हात ती शेकली

अंग ते तापले

थंडीचे भेव ते

दूर हो पळाले


नको ते स्वेटर

चोचले कशाला

घालवण्या थंडी

या हो शेकोटीला



साहित्याला गुण द्या
लॉग इन