शब्दसरी.....
शब्दसरी.....
1 min
74
नभात दाटुन येती
काळोख असा वरी
चिंब ओल्या आठवणींची
बरसे शब्दसरी
ओहळ ही खुणावे
डोळे ही पाणावे
कडाडते लत्ता ही
मन होतं चिंब खरी
हिरवळ मोहुन घेते
दुर- दुर ती नेते
ना वाटे परताया
भान ही असे जरी
वारा झोंबुन येतो
हळुच सांगुन जातो
काय शोधशी आता
या उपर ही तु तरी
परत सर ती यावी
दुर परत मज न्यावी
हरवले जिथे माझे ते
शोधायला वर वरी.
