शब्दपसारा
शब्दपसारा
1 min
153
ज्या वेळी मी शिकू लागले
कविता,चारोळी ,लेख लिहायला
शब्दांचा पसारा खूप वाढत चालला
शब्दांनी माझ्या मनाचा ठाव घेतला....
ध्यानी मनी स्वप्नी सतत शब्द अन शब्द
शब्दांच्या बागेत मी रमायला लागले
शब्दांच्याच आधारानेपुढे जाऊ जातेय
शब्दच माझे सखा,सजणा सर्व बनले...
शब्दांचा होतो कधीतरी गुंता खरे
पण तो मी अगदी अलगद सोडवते
शब्दांचे मणी छान वेचू लागते मग
शब्दांचीच वाक्ये अगणित बनवते....
शब्दांनीच शब्दांना छान सावरावे
शब्दांनी शब्दांनाच अलगद वेचावे
शब्दांनी शब्दांवर हळूच फूंकर घालावी
शब्दांच्या या पसार्यातच मनसोक्त रमावे....
