शब्दगाथा
शब्दगाथा
1 min
200
अर्थपूर्ण परिसंवादांचा शब्द हाच पाया,
शब्दसंपदा रूसलेल्यांचे जीवन जाई वाया!
राग,लोभ अन् ज्ञान सांगण्या शब्दच देती हात,
कठीण प्रसंगी शब्दांवाटे करता येते मात!
दोन भंगल्या हृदयांमधला शब्द सांधती दुवा,
क्षमाशील परि संवादातून भाव कळाया हवा!
