शब्दातून व्यक्त होताना
शब्दातून व्यक्त होताना
1 min
132
अनंत दुःखे सहन केली
थोड्याफार सुखातही नहाले शब्दातून व्यक्त होताना
शब्दबागेतच जरा रमले.....
झुल्यावर झुला घेतला
झुलताना गतकाली डोकावले
गतकालीन रम्य क्षणांमधे
आनंदाने चिंब चिंब भिजले.....
थोरामोठ्यांचे आशीश मिळवले
गुरूजनही पाठीशी उभे राहिले
मनातील भाव मम अंतरीचे
ह्रदय कुपीत बंद ठेविले....
माणूसकी मनापासून जपते
राग,द्वेश नको मनी समजवते
तोंडात साखर पेरते अन
डोक्यावर कायम बर्फ ठेवते...
शब्दातून व्यक्त होताना मात्र
प्रेम,माया,आपुलकी असते
कोणा बद्दलही मनी माझ्या
परके पणाची झालर नसते...
