शब्दांनी शिकवल...
शब्दांनी शिकवल...
1 min
299
शब्दामुळे होतो एखाद्याचा घात
आणि शब्दामुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ
शब्दांनी शिकवल
पडता पडता सावरायला
शब्दांनी शिकवलं मनातील हट्टाहास खोलायला
शब्दामुळे जुळतात
मना- मनाच्या तारा
आणि शब्दात मुळे चढतो एखाद्याचा पारा
शब्दांनी शिकवल हसता हसता रडायला
शब्दांनी शिकवल रडता रडता हसायला
शब्द जपून ठेवतात
त्या गोड आठवणी
आणि शब्दांमुळे ओघळते कधीतरी डोळ्यातून पाणी
शब्दांनी शिकवल सुख-दुःखात आनंदी राहायला
शब्दांनी शिकवल मनातील भावना व्यक्त करायला..
