शब्दांच्या गर्भात*
शब्दांच्या गर्भात*
1 min
302
कोंडलेल्या भावनांचे
शब्द होते काळजात....
नैराश्याचा दिप घेऊन
फिरत होते अंधारात....॥१॥
शब्दांच्या गर्भातली
जडभार झाली माती....
दिशाहीन वाटेवरती
शब्दांचीच असे शक्ती....॥२॥
शब्दांनीच दाखविले
गर्भातले अनेक मार्ग....
त्या शब्दकोशातूनच
मिळाला मायेचा स्वर्ग....॥३॥
पेरली बी कवितेची
मखमली या शब्दांनी....
जाईजुई ,चाफ्यासवे
दरवळे सुवास अंगणी....॥४॥
जुळवून सारे संदर्भ
कविता तयार झाली....
शब्दाच्या गर्भातून
फुलून आल्या वेली.... ॥५॥
