शब्दांची जादू
शब्दांची जादू
1 min
163
शब्द बोलावे नेहमी चांगले
शब्दातही जादू असते।
चांगले शब्द काढावे मुखातून
वास्तू तथास्तु म्हणत असते।
सकारात्मक वापरावे शब्द
त्यातही असते जादू बोलण्याची।
प्रत्येकाचे चांगले व्हावे म्हणावे
नंतर आपले ,,हीच खरी मांडणी शब्दाची ।
शब्दाला धार नसावी
असावा नेहमी आधार।
शब्द हे शस्त्र आहे जपून वापरतांना मानावे कधी
त्यांचे पण आभार।
अशी हीं शब्दांची जादू
जीवनात येते कामाला।
शब्द वापरावे नेहमी चांगले
समाधान वाटते मनाला।
