शब्दांचे मळे
शब्दांचे मळे
1 min
249
संस्कारीत मातीत
मूल्यांचे बीज पेरले
त्यास अक्षरांचे अंकूर फुटले
शब्दांचे घोस लागले.....
अक्षरांना चौदाखडीने नटवले
शब्दाशब्दांना ते जोडले
दोन, तीन,चार शब्दांचे
वाक्य सुरेख बनले....
शब्दांना जोडाक्षराची छान
हवी तिथे मग साथ दिली
वा! शब्दांना आले योग्य अर्थ
शब्दांचीच मग माला गुंफली.....
याच शब्दांना मग
विरामचिन्हाने सजवले
प्रत्येक वाक्याला योग्य अर्थ
प्राप्त होतोय हे समजले....
काही सरळ,साध्या शब्दांना
अलंकारीक शब्दांचा साज चढवला
हा तयार शब्दांचा मळा आता
बालचमूंच्या वाचनाने सुखावला.....
