शब्दांचा नट
शब्दांचा नट
आज आला अंत, प्रवास सारा कळला न्हाई.
प्रयत्नांचे पहिले पाऊल, त्याची आज आठवण येई.
केला होता अट्टाहास, काळ लोटला त्याला.
हाती घेतला असा जिंकन्याचा तो प्याला.
केली मोहीम फत्ते, सांगत्या त्या वेळेला.
नवनवीन शिकत गेलो कायम, बहर आला कलेला.
मझ सम असतील थोर, पण माझा प्रवास न्यारा.
मागे वळून पाहतो सुरवात, जाणवतो वेगळा वारा.
नाही कौतुक स्वतःच, कि नाही हा मोठेपणा.
शब्दांच्या दुनियेत, साहित्याचा ताठ झाला कणा.
केली होती केव्हा सुरवात, म्हणून आज झाला शेवट.
प्रवास बाकी सोबत आहे, महान शब्दांच्या विचारांचा नट.
