शब्दांचा खेळ
शब्दांचा खेळ
1 min
677
लेख,चारोळ्या, कादंबरी ,
काव्य, उखाणे, गाणी,ओवी
वाचक साक्षीदार
शब्दांचा सारा खेळ
या खेळाची गंमत न्यारी
नवे नाव अन नवी खेळणी
स्वर-व्यंजनाचा मेळ
शब्दांचा सारा खेळ
या खेळाची गोडी अवीट
रोज नव्याने ती चाखीत
त्यातूनच मांडतो नवा डाव
शब्दांचा सारा खेळ
या खेळाला नसे काळ-वेळ
नसे ठिकाण नसे नियम
व्यक्त होई मन
शब्दांचा सारा खेळ
आस लागे मज या खेळाची
तृप्त नाही मन शब्दांचा सारा खेळ
