शब्द
शब्द
1 min
410
शब्द तलवार
शब्द कधी ढाल
कधी मौनाला त्या
छेडतात शब्द
कधी अबोल ते
निशब्द शब्द
बोलू म्हणताना येतच नाहीत शब्द
नको तेव्हा भेदतात शब्द
जिव्हारी लागतात
रूततात खोलवर
नुसती मग जखमांची तगमग
विसरू म्हणते तर
आठवणी किती ?
छळतात नुसते नको ते शब्द
नावडत्या माणसांचे डसतात शब्द
किती ते किती मेंदूत शब्द ?
पुसते मग मी नावडते शब्द
झटकून टाकते नकारात्मक शब्द
सकारात्मक शब्द भरून मनात
आळवते हसरेच ते शब्द
