शब्द
शब्द
1 min
387
शब्दाविन रितेपण नको उगा घेऊ,
काळजाला दगडाचं नको नाव देऊ
असे कसे संपती तुझे लाडके रे शब्द,
शब्दाविना नको असा पोरका तू होऊ
दिसतील, हसतील, बोलतील सारे,
लाडका तू शब्दांचा अन् ते तुलाच प्यारे
कराची तू पळी कर, धर तुझी ओंजळ,
टपाटप पडतील मग बनुनी ते तारे
शब्दाविना जगणे हे व्यर्थ नको जगू,
संपले म्हणून नाते तसे नको हे तोडू
घेतील तुला कवेत, फक्त तू बाहू पसर,
शब्दांशी नको असा वैऱ्यासारखा वागू
