शब्द...
शब्द...
शब्दांनी शब्दांशी प्रीतीचे नाते जुळवावे
अलगद नव्या कळीने त्यातून उमलावे
शब्दांवर नको जास्त गोडीचा भार
फक्त प्रेम असावे एकमेकांबद्दल मनात अपार
हे शब्दची मांडतात या कडू-गोड भावना
कधी कधी देऊन जातात मनाला वेदना
या शब्दातून कधी जाणीव झाली वेदनेची
की मग आठवण येते आपल्या जवळच्या व्यक्तींची
शब्द हसवतात, शब्द रडवतात
शब्दाच्या कलेत काव्य सजतात
विविध रंगाची उधळण करित
हे शब्द जणू आपल्याला कवेत घेतात
जीवनातले खेळ सारे शब्दाने चालतात
म्हणूनच शब्दांची असावी किंमत सर्वांच्या मनी
हीच तर आहे शब्दांची खासीयत जुनी...
