शब्द
शब्द
1 min
417
शब्द मोजताना शब्द संपत नव्हते
शब्द मोजताना काही शब्द हरवले होते
एकएकास बघताना अंक मोजायचे चुकत होते
लोभस, लाघवी शब्द भुरळ मनाला पाडत होते
ओळींचा गुच्छ होता सुगंध रांगेत उभे होते
विस्कटलेल्या शब्दांचे स्वर आक्रोशात निनादत होते
शब्दांच्या बुडबुड्यांवरती शब्द विरले होते
शब्दांचे घाव शब्दांस कवितेचे विव्हळणे होते
