STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

शब्द

शब्द

1 min
151

शब्दांना धार असते,

शब्दांना गती असते,

शब्द मधुर असतात,

शब्द फुलांहुनही,

मऊ असतात


शब्द कडवे असतात,

अननसाच्या फळासारखे,

काटे काढले की,

गोड गर असतो त्यात


शब्दांना भाषा असते,

आपली भाषा बोलतात ते,

तेव्हा आनंद होतो, किंवा राग येतो,

म्हणून शब्दांना आपली भाषा असते.


शब्दांचा प्रयोग, गोड बोलून,

करता येतो,

मंथराने केलाच होता,

कैकयीसाठीच,

परंतु त्या शब्दांनीच,

नाही का, लंका दहन झाली


शब्दांचा गुण आपले,

गुण राखतात,

आणि आपण ते घ्यायचे की,

नाही आपल्यावर सोपवतात


शब्दांचा उच्चार,

जिभेने करावयाचा नसतो,

तो बुद्धीने करावयाचा असतो,

नाहीतर म्हणावे लागते,

जीभ, घसरली आणि टाळ्याला लावली


Rate this content
Log in