शब्द...
शब्द...
शब्द कधी ठरलेले नसतात
लिहितो आपण जे कागदावर
शब्द येतात नकळतपणे लेखणीत
असतात जे बिंबलेले आपल्या मनावर...
शब्द मुळात ठरवता येतच नसतात
कारण असतात ते मनातच मुक्तछंद
शब्द कुणाचे बांधीलही नसतात
वाहतात ते जणू पावसातला मृदुगंध...
शब्द ठरवून कधी येतच नसतात
असतात मुळात ते भावनेच्या रसात
वाहतात कधी ते डोळ्यांच्या अश्रुतून
तर भिनतात कधी ते देहाच्या नसानसात...
शब्दांचे खेळ कधी करता येत नसतात
असतात खेळकर ते लहान बाळासारखे
रडवतात कधी कुठल्याही दिग्गजाला
तर पलटवारही कधी ते करतात काळासारखे...