शब्द
शब्द
1 min
472
शब्दानेच नाती
जोडले जातात
शब्दानेच नाती
तोडले ही जातात
शब्दानेच जीवनाचे
सारे तराणे
शब्दानेच सारे
जीवन गाने
शब्दानेच काळजावर
जखमा होतात
शब्दानेच जखमावर
मिठही चोळले जातात
शब्दानेच डोळे
पानावले जाते
शब्दानेच मनावर
घाव होते
शब्दानेच नाती
जवळ येतात
शब्दानेच नाती
कापल्या जातात
शब्दच आनंदचे
द्वार खोलतात
शब्दच दुःखात
भर पाडतात
शब्दानेच प्रेम
व्यक्त होते
शब्दानेच भावना
दुखावले जाते
शब्दानेच कित्येक
गोष्टींचे कारण कळतात
शब्दानेच चांगले वाईट
गोष्टी घडतात
