STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

शब्द वैभव

शब्द वैभव

1 min
476

"ळ" अभिमान मराठी

भाषा समृद्ध मराठी।

"ळ" कमळाचे वैभव

जपू या शब्द वैभव।।धृ।।


कावळ्याची काव काव

काळाकुट्ट काळा भाव।

बगळ्याचा इर्षा भाव

पांढरा शुभ्र तो राव।।१।।


ससा पळणार किती

कासवांची मंद गती ।                 

आता बगळ्या दुध दे

सारी बोट रंगून दे।।२।।


आजी भोपळा बसली

वाघोळा गाठ पडली ।

लेक बाळी कडे जाते

टुन टुन होऊन येते ।।३।।


कोल्हा विहरीस आला

तेथे वाघोबा फसला ।

खाऊ नको तू मला

ते प्रतिबिंब तळाला।।४।।


बाळाला आणली वाळे

नि सुंदर खुळखुळे।

खुदकन हसे बाळ

हेमंत ऋतुचा काळ।।५।।


क ख ग ळ वाचे बाळ

घड्याळा कळे काळ।

पळ शिकता मोजता

झाली सध्यांकाळ आता।।६।।


दिवाळीला कडबोळे

होळी ती पुरण पोळी ।

तीळगुळ गोड गोड

हिवाळ्याचे गोडधोड।।७।।


उन्हाळी उन्हाळी झळा

पावसाळी पाणी भोळा

वाच हनुमान चाळीसा

पळे भूतबाधा पळा।।८।।


Rate this content
Log in