शब्द सरिता
शब्द सरिता
1 min
179
शब्दांना एका प्रवाहात आणून
वाहते ती शब्द सरिता
कविता काय करु शकते?
शब्दात प्राण फुंकून
अलंकृत करते कविता
नासुर शब्दांना वजन देऊन
विद्रोहाची पेटविते चिंगारी
का शोषण होतं आहे?
विस्कटलेल्या मनाला एकत्र करून
त्या एक सुरांची उडणारी ठिंगारी
एक एक शब्द मळून
कला सादर करते
का निराशा दाटली?
निराशेत फुलं उमलवून
फुलात सुगंध घालते
परमेश्वराचं वरदान बणून
आनंद पसरवित जाते
का दुःख चहूकडे?
दुःखाना वाचा,सुख शोधून
ही सुगंधी परसबाग
माणसा माणसांना ठेवते जोडून
