STORYMIRROR

Meera Bahadure

Others

3  

Meera Bahadure

Others

शब्द सरी मिळाली.

शब्द सरी मिळाली.

1 min
188

उन्हाच्या त्या ज्वाले पासून

सुटका करण्यास आली

कवी राजा घे लेखणी हाती

पावसा सवे जणू तुला शब्दसरी मिळाली

पक्ष्यांच्या आवाजाने गजबजून टाकण्या

बेडकांच्या आवाजाने पोट धरून हसण्याचे शेतकर्‍यांच्या दुःखावर ओलावा पांघरण्या

वार्यातिल थंडाव्याची झुळूक आली

कविराज घे लेखणी हाती

पावसा सवे तुला शब्दसरी मिळाल


वाळलेल्या पानांच्या झाडास

नवी पालवी मिळाली

धरती मायेच्या मनास शांत केली

मातीचा सुगंध दरवळूण्या

कविराज घे लेखणी हाती

 पावसा सवे तुला शब्दसरी मिळाल


प्रेमाच्या भावना जागृत झाल्या

आठवणींना उजाळा मिळाला

हरवण्या अनुरागाच्या मोहात जणू

प्रितची चाहूल मिळाली

ओसांडून गेला मग प्रेमसागर

लेखणी माझी लिहीत सुटली

पावसाने खरोखर मज

 शब्द सरीच मिळाली

पावसाने खरोखर मजा शब्द सरीच मिळाली


Rate this content
Log in