STORYMIRROR

Sneha Bawankar

Others

4  

Sneha Bawankar

Others

✍️शब्द-शृंगार.......✍️

✍️शब्द-शृंगार.......✍️

1 min
290

बघा आज मी शब्दांचा शृंगार मांडला

प्रयत्न करते की रस येईल माझ्या प्रत्येक ओळीला

खरं तर शब्दांचा खेळ मी मांडला

जिथे साथ प्रत्येक शब्दाला चिन्हानी दिला 


सुरुवात आहे ही माझी दुसऱ्या कळव्याला

त्या कळव्यातील दुसऱ्या ओळीला

जिथे मी शब्दांचा राग फोडला

आणि माझा दुसरा कळवा इथेच संपला


दार उघडते मी माझ्या विचारांचे

शब्द सोडते आज रंगा-रंगांचे

तिसऱ्या कळव्यातील तिसऱ्या ओळीचे

आता शब्द संपिले इथेच या ओळीचे


शृंगार होता या माझ्या शब्दांचा

शब्दातील माझ्या प्रत्येक विचारांचा

आशेतील माझ्या भव्य किरणांचा

विराम घडविते आता या शब्द-शृंगारांचा


Rate this content
Log in