STORYMIRROR

Aarya S

Others

2  

Aarya S

Others

शब्द सामर्थ्य

शब्द सामर्थ्य

1 min
143

जमतंय आता मला, शब्दां बरोबर खेळायला .  

शब्दच करतात सोबत, हे लागलय मला कळायला . 


कुणीच नसते सोबत जेंव्हा ,शब्द मात्र हे देती साथ . 

गुंतवून ठेवीत शब्दामध्ये , एकटेपणावर देती मात . 


असते शब्दांची गोष्टच न्यारी ,ते वळवावे तसे वळतात . 

अर्थ ज्याचा त्याने शोधावा , ते कळायचे त्यांना कळतात. 


शब्दच घेतात नेहमी ,समोरच्याच्या मनाचा ठाव.

आणि शब्दच करतात कधी कधी, मनावर जिव्हारी घाव. 


शब्द जपून बोला ,सांगतात सगळे जण . 

कारण चुकलेला एक शब्द ,आणि आयुष्यभर कायमचा व्रण. 

 

डोळेच डोळ्यातून नेहेमी ,शब्दांचं दुःख गाळतात . 

अश्रू लपवताना खरंच, शब्द बोलणं टाळतात . 


सांगायचं असत खूप त्याना ,पण कधी कधी मौन पाळतात 

शब्द असतात असेच वेडे ,ते आपला शब्द पाळतात . 


Rate this content
Log in