शब्द मोतीयांची माळ
शब्द मोतीयांची माळ
1 min
369
साज शब्दांचा बाई गं
कसा शब्दात मांडू
त्याचा सुगंधी पेटारा
कसा शोधून काढू
शब्द प्रेमाचा वाटे
मना मधूर गोड
क्रोधामध्ये तोच शब्द
जणू कारल्याची फोडं
शब्द गुंफता माळेत
बने मोतीयांची माळ
शब्द कोमल नाजूक
बोले बोबडे ते बाळ
शब्द पांगतात कधी
जेव्हा तुटते ही माळ
शब्द संपतात तिथे
पुढे पळतो काळ
शब्द निघता गळ्यातून
स्वर सुरात हसतो
शब्द एकच बाईपण
किती खेळ हा खेळतो
