शब्द माझी ओळख
शब्द माझी ओळख
1 min
276
लिहिते सारे मनापासूनी
अक्षर पहा माझे बोलती
शब्दांची करुनी गुंफण
मनाचा ठाव ते सांगती
भाव सारे मी उतरवते
मनापासून व्यक्त होते
सुख दुखात ही माझ्या
लेखणी मला आधार देते
खूप आहे शिकण्यासारखं
आणखी पुढे जायचं आहे
माय मराठीसाठी माझ्या
बरंच काही करायचं आहे
साहित्य आणि राष्ट्रासाठी
सेवाव्रत हे हाती घेतलं
प्रपंच जरा मागे सारून
समाजहिताचं कार्य स्वीकारलं
