शब्द माझा सोबती
शब्द माझा सोबती
1 min
390
शब्द माझा सोबती मार्गदर्शक खरा
शोधून पहावे सदा येईल अनुभव सारा
शब्द जाता सुचत होईल माळ कवितेची
अर्थ यमक भाव सगळ्यांनी समजायची
पूर्ण वाचून येईल अर्थ भाव समजून
थोडे भावनिक व्हा घ्या मने जुळवुन
चांगलेच त्यातून मार्ग सापडेल
अडखळले कार्य समाजात दिसेल
योग्य अयोग्य दिशा मार्गातून सापडेल
नक्की वाचा तुम्ही जीवन सुधारेल
