शब्द कधी... कधी...
शब्द कधी... कधी...
1 min
323
शब्द जाळती
शब्द छळती
शब्द टाळती
कधी... कधी...
शब्द दुःखही
शब्द सुखही
शब्द चुकही
कधी... कधी...
शब्द सावरती
शब्द आवरती
शब्द विखुरती
कधी... कधी...
शब्द धीरही
शब्द वीरही
शब्द फकीरही
कधी... कधी...
शब्द सारथी
शब्द प्रिती
शब्द आरती
कधी... कधी...
